एनसीबीने 60 कोटी रुपयांच्या एमडीसह तीन आरोपींना केली अटक
एनसीबी, मुंबईने मुंबईतील विविध भागात कार्रवाई करत 60 कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जसह तीन आरोपींना अटक केली आहे
एनसीबीने 60 कोटी रुपयांच्या एमडीसह तीन आरोपींना केली अटक
श्रीश उपाध्याय/मुंबई
एनसीबी, मुंबईने मुंबईतील विविध भागात कार्रवाई करत 60 कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जसह तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ६९ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. एनसीबी मुंबईचे अतिरिक्त संचालक अमित घावटे यांनी ही माहिती दिली आहे.
अमितने सांगितले कि, डोंगरी भागात ड्रग्जचा मोठा व्यवहार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने डोंगरी आणि नागपाडा परिसरात सापळा रचला.
एनसीबीने मुशर्रफ नावाच्या व्यक्तीला थांबवून चौकशी केली असता त्याच्याकडून 10 किलो एमडी जप्त करण्यात आले. मुशर्रफ यांच्या चौकशीच्या आधारे नौशीन नावाच्या महिलेच्या घरावर छापा टाकण्यात आला. छाप्यात 10.5 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.
नौशीनच्या चौकशीच्या आधारे वडाळा परिसरातून छापा टाकून सैफ नावाच्या अमली पदार्थ विक्रेत्याला ११ किलो एमडीसह अटक करण्यात आली. छाप्यामध्ये ६९,१३,४०० रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
अमित घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपाडा आणि डोंगरी भागातून आणखी अमली पदार्थ जप्त होण्याची शक्यता आहे. एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे.