प्राण/मुंबई
,
माजी संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची चांदिवली येथे शोकसभा झाली.
नसीम खान यांनी श्री मुलायम सिंह यादव यांना आदरांजली वाहताना त्यांना राज्यघटना आणि समाजवादाचे रक्षक असे वर्णन केले आणि त्यांच्या समाजवादी विचारसरणीची प्रशंसा केली.यावेळी अनेक वक्त्यांनी श्री मुलायम सिंह यादव यांच्या कार्याचे स्मरण केले.
या शोकसभेत महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान, अजय यादव, निसार खान, सुरेंद्र प्रताप सिंग, आर.पी.यादव, राजेंद्र यादव, माताप्रसाद यादव, महेंद्र यादव, चंद्रिका प्रसाद यादव, राम नरेश यादव आदींची उपस्थिती होती. तसेच अनेक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.