बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात 9 महिन्यात 185 शेतकरी आत्महत्या, बुलढाण्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था
बुलढाणा - बुलढाणा जिल्ह्यात 9 महिन्यात 185 शेतकरी आत्महत्या, बुलढाण्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था
अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, खते व कीटकनाशकांसाठी येणारा अतिरिक्त खर्च, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, मुलांचे शिक्षण इत्यादी कारणांमुळे या शेतकरी आत्महत्या होत असल्याचे दिसून येत आहे..
मराठवाडय़ाला आणि विदर्भाच्या सीमेवरील बुलडाणा जिल्ह्यात 9 महिन्यामध्ये 185 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत..राज्य सरकारकडे आर्थिक मदतीसाठी आत्महत्याग्रस्त 185 पैकी 37 शेतकरी कुटुंबाची प्रकरणे पात्र आहेत तर 32 आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत देण्यात आली असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा सामान्य प्रशासन नैसर्गिक आपत्ती विभागाचे नायब तहसीलदार संजय बनगाळे यांनी दिली आहे..
1) जानेवारी :- 24 शेतकरी आत्महत्या- 5 पात्र-17 अपात्र- 2 चौकशी करिता प्रलंबित..
2) फेब्रुवारी- 24 शेतकरी आत्महत्या- 8 पात्र- 14 अपात्र- 2 चौकशी करिता प्रलंबित..
3) मार्च- 19 शेतकरी आत्महत्या- 4 पात्र-10 अपात्र- 5 चौकशी करिता प्रलंबित..
4) एप्रिल- 26 शेतकरी आत्महत्या-10 पात्र-14 अपात्र-2 चौकशी करिता प्रलंबित..
5) मे- 24 शेतकरी आत्महत्या- 6 पात्र-10 अपात्र-8 चौकशी करिता प्रलंबित..
6) जून- 22 शेतकरी आत्महत्या- 3 पात्र- 8 अपात्र- 11चौकशी करिता प्रलंबित..
7) जुलै- 19 शेतकरी आत्महत्या- 1 पात्र- 5 अपात्र-13 चौकशी करिता प्रलंबित..
8) ऑगस्ट- 24 शेतकरी आत्महत्या- 0 पात्र- 4 अपात्र- 20 चौकशी करिता प्रलंबित..
9) सप्टेंबर- 3 शेतकरी आत्महत्या- 0 पात्र- 0 अपात्र- 3 चौकशी करिता प्रलंबित..
असे एकूण 9 महिन्यात 185 शेतकरी आत्महत्या झालेल्या आहे. पैकी 37 पात्र तर 82 अपात्र आणि 66 चौकशी करिता प्रलंबित ठेवण्यात आले असून 32 शेतकरी आत्महत्यागस्त कुटुंबातील नातेवाईकांना मदत देण्यात आली आहे.
बाईट- संजय बनगाळे , ना. तहसीलदार सामान्य प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा