बातम्याबीडमहाराष्ट्र
बीड – सौताडा येथील रामेश्वर धबधब्याचे विहंगम दृश्य
बीड - सौताडा येथील रामेश्वर धबधब्याचे विहंगम दृश्य
बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब भरून वाहतायेत. अशातच सौताडा येथील रामेश्वर धबधब्यावरुन धो-धो पाणी कोसळू लागले आहे. शंभर फुटापेक्षा जास्त उंच धबधब्यावरुन कोसळणारे पाणी पर्यटकांना भुरळ घालतंय. या धबधब्यावरील तलाव ओव्हरफ्लो झाला असून सध्या एका धारांमधून पाणी कोसळत आहे. रामेश्वर मंदिरामुळे धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही सौताड्याची ओळख आहे. बीड आणि अहमनदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावात धबधब्याचे निसर्गरम्य विहंगमदृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.