महाराष्ट्रमुंबई
Trending
अनुदानानुसार वाढीव भत्ता मिळवण्यासाठी शिक्षक समन्वयक संघाचा महाएल्गार
अनुदानानुसार वाढीव भत्ता मिळवण्यासाठी शिक्षक समन्वयक संघाचा महाएल्गार
गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला विना तथा अंशतः अनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न निकाली लागलेला नाही. अनेकदा मंत्रीगणांशी चर्चा होऊन सुद्धा काहीच हाती लागलेलं नाही यासाठी अंशतः अनुदानित शाळेच्या शिक्षकांनी महाएल्गार पुकारला आहे. या धरणे आंदोलनांतर्गत, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचं जे मूल्यांकन तर केले जाते. त्यात असलेल्या निकषानुसार आम्हाला सरसकट अनुदान लागू करावे ही मागणी शिक्षक करत आहेत. यासाठी माझा पगार, माझी जबाबदारी आणि शेवटची मुंबई वारी या बॅनरखाली शेकडो शिक्षक आझाद मैदान येथे तग धरून बसले आहेत.
बाईट – प्राध्यापक संतोष वाघ
बाईट – प्राध्यापक सुजाता खट्टे