मुंबईत नवीन वाहनांना बंदी न घातल्यास शिवसेना रस्त्यावर उतरणार
माजी आमदार बाबुराव माने यांचा शिंदे सरकारला ईशारा
विजय कुमार यादव
मुंबई-दि. 22
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा श्वास दिवसेंदिवस कोंडत चालला असून अशीच परीस्थिती राहीली तर पर्यावरणाचा ऱ्हास ,प्रदूषण व ट्रॅफिकमुळे मुंबई जागीच ठप्प होईल अशी भीती व्यक्त करतानाच प्रशासनव सत्ताधायांनी नवीन वाहनांची नोंदणी त्वरित बंद करावी, अनावश्यक वाहनांवर दंड आकारून ती सरकारजमा करावीत,परदेशातील रस्ते आणि वाहनांसंदर्भात केलेल्या नियोजनाप्रमाणे मुंबईतील रस्ते, फुटपाथ व वाहने याचे योग्य नियोजन तसेच नवीन वाहनांचा ना हरकत परवाना देण्यासाठी महिनाभरात तज्ज्ञ व्यक्तींची समिती नियुक्त करावी यासह ईतर महत्वाच्या सूचना धारावीचे
माजी आमदार व शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा निरीक्षक बाबुराव माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे .त्वरीत यासंदर्भातील निर्णय न झाल्यास शिवसेना मुंबईत रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवायराहणार नाही असा ईशारा माने यांनी दिला आहे . . देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबई प्राकृतिकरित्या फुगत चाललेली आहे. एकट्या मुंबईची लोकसंख्या २ कोटी ४ लाख,११ हजार २७४ इतकी आहे कार – १२,५२,२४६ ,दुचाकी – २५,४१,०३३ ,ऑटो रिक्षा – २,३३,३२५ टुरिस्ट टॅक्सी – ७९,९४४ ,मीटर टॅक्सी – ४४,१७१ स्कूल बस ३,०८६ अशी सर्वच वाहनांची संख्या ४२ लाख ८१ हजार २५१ इतकी प्रचंड आहे यात या संख्येत दिवसेंगणिक वाढत होत चालली आहे . मुबईतील वाढती वाहने बाहेरगावावरून येणारी अंदाजे १० हजार वेगवेगळी वाहने यांची संख्या लक्षात घेता दररोज ५० लाख वाहने दररोज रस्त्यावर येतात यात रस्त्यांवरची २० टक्के जागा वाहनांच्या पार्किंग साठी व्यापली जात आहे राज्याच्या जवळपास चारपट मुंबईत वाहनांची घनता असल्याचे माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनात आणून दिले आहे
दुतर्फा असणाऱ्या वाहनांमुळे ट्रॅफिक जाम होणे,मुंबईकरांना, नोकरदारांना व रुग्णांना इच्छित स्थळी वेळेत पोहचता न येणे प्रदूषण होणे ,आपापसात भांडणे होणे ,गंभीर ट्रॅफिकमुळेरुग्णवाहिका रुग्णालयात वेळेत पोहोचू न शकल्याने रुग्णांचे जीव जाणे आदी गंभीर प्रकार वाढत चालले आहेत परदेशात वाहने रस्ते तसेच फुटपाथ यांचे सुयोग्य नियोजन आहे त्यामुळे तिकडे या समस्या उद्भवत नाहीत मुंबईत या नियोजनाचा प्रचंड अभाव आहे .मुंबईत भंगारात गेलेल्या वाहनांसाठी मुंबई महानगरपालिकेला एस आर ए प्राधिकरणाने माहुल येथील १० हजार चौरस मीटरचा भूखंड दिलेला असला तरी पालिका आणि पोलिसांकडे जमा झालेल्या गाड्या भंगारात धूळ खात पडल्या आहेत ही जमा झालेली वाहने भंगारात जाण्यासाठी माहुल येथील भूखंड टेकडीवर असल्याने अद्याप तो वापरात आला नाही आणि पर्यायाने मुंबईतील या जमा करण्यात आलेल्या सर्व गाड्यांचे करायचे काय ही मोठी डोकेदुखी पोलीस तसेच पालिकेसमोर आहे अशी माहिती माने यांनी आपल्या पत्रातून दिली आहे या सर्वात मुंबईकरांचा श्वास कोंडत चालला असून एक दिवस संपूर्ण मुंबईच जागीच ठप्प होण्याचा गंभीर धोका असल्याचे माने यांनी निदर्शनात आणून दिलेआहे यासाठी अधिकारी आणि राज्यकर्त्यांनी मुंबईतील वाहनांच्या संख्येवर आळा घालणे हि काळाची गरज असून मुंबईतील वाहने प्रदूषण ,ट्राफिक व मुंबईकर या विषयावर राजकारणापलीकडे जाऊन निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे माने यांनी म्हटले आहे
आर्थिक लाभासाठी विकासक मोठमोठे टॉवर उभे करीत आहेत त्यामुळे मुंबईची लोकसंख्या वाढतच असून मुंबईला मोठी सूज आलेली आहे राज्यकर्त्यांनी याचा गांभीर्याने विचार न केल्यास भविष्यात मुंबईला कोरोनापेक्षा मोठ्या जीवित आणि वित्तहानीला तोंड द्यावे लागणार आहे असा सूचक ईशारा माने यांनी दिला आहे मुबईतनवीन वाहनांची नोंदणी त्वरित बंद करावी, घरटी असलेल्या अनावश्यक वाहनांच्या संख्येचा आढावा घ्यावा व अनावश्यक वाहनांवर दंड आकारून ती सरकारजमा करावीत ज्यांना अत्यावश्यक आहेत त्यांनाच नवीन वाहनांचे परवाने द्यावेत