करमणूकनागपूरबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

बॅनरबाजीवरून भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्ष.

बॅनरबाजीवरून भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्ष.

श्रीश उपाध्याय/मुंबई
————————
राज्यात नवीन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षाची परिसीमा ओलांडत आहे.पूर्वी मुंबईत जोरदार बॅनरबाजीचे वातावरण होते, तो आता शिवसेना-भाजप वादात नवा विषय बनला आहे.

नुकताच वरळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या दहीहंडीबाबतचा वाद अजूनही संपलेला नसताना शिवसेनेने एसी मार्केट बस स्टॉप, ताडदेव येथे नियमांप्रमाणे भाजपने लावलेले गणपती बाप्पाचे पोस्टर्स जबरदस्तीने ताब्यात घेतली आणि त्या गणपती बाप्पाचे होर्डिंगवर आपले वैयक्तिक होर्डिंग लावले. युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद  साधताना बोले की, “उद्धवजी ठाकरेंना माझे आवाहन आहे की, आमच्या नेत्यांचे नियम लक्षात घेऊनचं बॅनर्स लावले आहेत त्यावर तुमचे बॅनर लावणे बंद करा, अन्यथा युवा मोर्चाला आमच्या शैलीत उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत.

“या वादाचा कोणताही अंतिम पैलू आपल्याला दिसत नाही. याला उत्तर देण्यासाठी युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चा मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी मुंबईतील ताडदेव परिसरात, एसी मार्केट बस स्टॉपकडे पोहचून शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांनी लावलेले अनधिकृत होर्डिंग उखडून टाकले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button