करमणूकनागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

ॲफ्रो-इंडियन इन्वेस्टमेंट समिट

मुख्यमंत्र्यांची युगांडाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई, दि. 8 :

युगांडा देशात होणाऱ्या ॲफ्रो-इंडियन इन्वेस्टमेंट समिट – 2022 च्या पार्श्वभूमीवर युगांडाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान युगांडा येथे आयोजित गुंतवणूक परिषदेत (इन्वेस्टमेंट समिट) महाराष्ट्राने सहभागी होण्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळाने दिले.

या शिष्टमंडळात युगांडाचे परराष्ट्र राज्यमंत्री हेन्री ओरेम ओकेलो, भारतातील उच्चायुक्त मार्गारेट क्योजिरे, मुंबईतील वाणिज्य दूत मधुसूदन अग्रवाल, युगांडातील इंडियन असोसिएशचे अध्यक्ष मोहन राव, महासचिव वाहिद मोहम्मद, कंपालातील इंडियन बिझनेस फोरमचे सचिव मोहन रेड्डी आदी उपस्थित होते.

यावेळी उभयतांमध्ये विविध क्षेत्रातील प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी युगांडाच्या एकंदरित प्रगतीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री हेन्री ओरेम ओकेलो यांनी युगांडाच्या इतिहास आणि प्रगतीबाबत माहिती देताना युगांडामध्ये गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक भारतीय उद्योजकांनी या देशात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करून युगांडाच्या आर्थिक उन्नतीत सहभाग नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून यशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आगामी गुंतवणूकदारांसाठी एक खिडकी योजनाही राबविली जाईल. भारत आणि युगांडा देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी या परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण श्री. ओकेलो यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांना दिले.

महाराष्ट्र शासनाने प्रामुख्याने कृषी, पर्यटन, खनिकर्म आणि शिक्षण क्षेत्रावर भर दिला आहे. त्यादृष्टीने राज्य शासन काम करीत आहे. या क्षेत्रांच्या विकासासाठी दोन्ही राष्ट्रांमध्ये परस्पर पूरक सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही राष्ट्रांत गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्र शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button