Uncategorizedकरमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

महाराष्ट्र – राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक- 2022 निकाल जाहीर

महाराष्ट्र - राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक- 2022 निकाल जाहीर

मुंबई, दि. 11 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी काल दिनांक 10 जून 2022 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून या राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीत 7 उमेदवारांपैकी 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहे.

विजयी उमेदवारांच्या निवडणूक क्रमवारीनुसार पीयूष वेदप्रकाश गोयल यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य, डॉ.अनिल सुखदेवराव बोंडे यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य मिळाले आहे. इम्रान प्रतापगढी यांना पहिल्या फेरीत 4400 मत मूल्य मिळाली आहे. प्रफुल मनोहरभाई पटेल यांना पहिल्या फेरीत 4300 मत मूल्य मिळाली असून संजय राजाराम राऊत यांनाही पहिल्या फेरीत 4100 मत मूल्य मिळाली आहेत. तर धनंजय भीमराव महाडिक यांना तिसऱ्या फेरीत 4156 मत मूल्य मिळाली असून हे सर्व 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी केलेल्या मतदानात 284 वैध मते ठरली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button