सेवा वाहीन्या बाजुला न घेताच काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या पूणे लिंक रोड चे अनेक ठिकाणी कॉक्रीट तोडून करावी लागत आहे जलवाहिन्यांची दुरुस्ती !
सेवा वाहीन्या बाजुला न घेताच काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या पूणे लिंक रोड चे अनेक ठिकाणी कॉक्रीट तोडून करावी लागत आहे जलवाहिन्यांची दुरुस्ती !
कल्याण – पूणे लिंक रोडचे रुंदीकरण आणि क्राँक्रीटीकरण करतेवेळी काँक्रीटच्या रस्त्या खाली जलवाहीण्या आहेत त्याच ठिकाणी गाडण्यात आल्या आहेत . याच जलवाहिन्या आता कॉक्रीटच्या ओझ्याने फुटू लागल्या असून या जलवाहिन्यांची अनेक ठिकाणी गळतीला सुरुवात झाली आहे . अशाच प्रकारातून तिसगांव नाक्यावर गेली अनेक महिने काँकीट खाली फुटलेली जलवाहिणी काँक्रीट तोडून दुरुस्त करावी लागली आहे .
तिसगांव नाक्यावरील एका मटण विक्री दुकानासमोरील काँक्रीट च्या रस्त्या खालुन गेली महिनाभर पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार होत होता . परंतु रस्ता कॉक्रीटचा असल्याने या गळतीची दुरुस्ती करणे शक्य नव्हते . परंतु गळतीचे प्रमाण वाढतच चालले असल्याचे निदर्शनास येताच अखेर गळतीच्या ठिकाणचा काँक्रीटचा रस्ता फोडून काढण्यात येवून ही गळती बंद करण्यात आली आहे .
या ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागापासुन सुमारे ४ फुट खाली असलेल्या ३५० एम एम व्यासाच्या कॉस्टींग धातुच्या जलवाहिणीला सुमारे २ ते ३ इंचाचे मोठे भगदाड पडल्याचे आढळून आले . या बाबत संबंधीत दोष दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारानाने सांगितले की रस्त्याचे काँक्रीटीकरण करतेवेळी सदरचा पाईप फुटला असावा परंतु या फुटलेल्या पाईपावर काँक्रीट टाकून हा फुटलेला भाग बंद केल्याचे आढळून आले . हेच कॉक्रीट निघून गेल्या नंतर या ठिकाणी पाण्याच्या गळतीला सुरुवात झाली असावी . ही दुरुस्ती करण्यासाठी काँक्रीटचा रस्ता फोडल्या शिवाय पर्याय नव्हता . अशाच प्रकारचे काँक्रीटच्या खाली जलवाहीणी फुटण्याचे प्रकार विठ्ठलवाडी स्टेशन जवळ, हॉटेल प्रसाद समोर, गुंजाई चौक, चक्की नाका या ठिकाणीही या पूर्वी घडले आहेत . या ठिकाणीही अशाच प्रकारे दुरुस्ती करावी लागली असल्याचे ठेकेदाराने सांगितले .
वास्तवीक पहाता कायम स्वरूपी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्या पूर्वी रस्त्याच्या काँकीटकरणात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा वाहीन्या या रस्त्याच्या कडेला स्तलांतरीत करणे ( युटीलीटी ) अपेक्षीत असतांना पूणे लिंक रोडच्या काँक्रीटीकरण कामात अशा प्रकारची युटीलीटी केली गेली नसल्याने आता अशा प्रकारे ठिकठिकाणी काँक्रीटचा रस्ता फोडून दोष दुरुस्ती करावी लागत असल्याने या कामी महापालिकेच्या पैशाची नासाडी तर होत आहेच शिवाय या प्रकारातून नागरीकांनाही मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे . याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सुज्ञ नागरीकांत विचारला जावू लागला आहे .