क्राईममहाराष्ट्रमुंबई

35 घरफोडी केलेल्या सराईत ईसमांना एम एच बी कॉलनी पोलीसांकडून अटक

35 घरफोडी केलेल्या सराईत ईसमांना एम एच बी कॉलनी पोलीसांकडून अटक

मा.पोलीस आयुक्त , बृहन्मुंबई यांनी मुंबई शहरात वाढत असलेल्या घरफोडी व चोरी यांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर अशा प्रकारचे गुन्हयांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेशित केले त्याप्रमाणे मा . अप्पर पोलिस आयुक्त , उत्तर प्रादेशिक विभाग , कांदिवली ( पु ) , मुबई तसेच मा . पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ११ , मुंबई व मा . सहायक पोलीस आयुक्त , बोरिवली विभाग , मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व वपोनि , सुधीर कुडाळकर , एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे , मुंबई यांच्या थेट देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण पथक यांना याबाबत कारवाई करण्यास आदेशित केले आहे .

त्याप्रमाणे दि . 17/05/2022 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरिक्षक संदीप साळवे , पोहक्र . 961391 / शिंदे , पोनाक्र . 980725 / खोत , पो.शि.क्र . 140340 / मोरे , पोशिक्र 113194 / आहिरे , पोशिक्र . 111518 / सवळी असे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असतांना एक्सर तलाव परिसर , एक्सरगाव , बोरिवली ( प ) , मुंबई येथे दोन इसम हे संशयास्पदरित्या हालचाल करताना आढळून आल्याने गस्तीचे वाहन थांबवुन त्यांची चौकशी करणेकामी त्या दोन्ही इसमांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले म्हणून पोशि , 140340 / मोरे व पोना • 980725 / खोत यांनी त्यांचा पाठलाग केला व पो उप नि संदिप साळवे , पोह 961391 / शिंदे , पोशि 113194 / आहिरे , पोशि 111518 / सवळी यांनी त्या दोघांना घेराव घालुन ताब्यात घेतले त्यानंतर दोन्ही इसमांना त्यांची माहिती विचारली असता त्यांनी त्यांचे नाव । ) मो यासिन शौकत अन्सारी , वय 45 वर्षे , धंदा नाही , राठी- अलवी नगर , गाव लोणी , सरकारी शाळेजवळ , जिल्हा गाझियाबाद , उत्तरप्रदेश 201102 मोबा- 9289476738 व

2) मो जमिल अहमद मोहम्मद हुसैन अंसारी , वय 44 वर्षे , धंदा- नाही , राठी इ 16 , के 682 , न्यु शिलमपुर , दिल्ली 53. मोबा- 9910737714 अशी माहिती दिली . त्यानंतर दोन पंचांना बोलावून दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे अ ) एक 9 इंच लांबीचा हिरव्या मुठीचा स्क्रू ड्रायवर ब ) फोल्डिंगची दिड फूट लांबीची कटावणी क ) एक अॅडजस्टेबल पान्हा अशी हत्यारे मिळुन आली त्याचा पंचनामा करुन सदर इसमांना चौकशी कामी पोलीस ठाणेस आणले . त्यानंतर त्या दोघांना सदर ठिकाणी फिरण्याचा उद्देश विचारला असता त्यांनी उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिल्यामुळे सदर इसमांना मा . वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुधीर कुडाळकर तसेच पोलिस निरिक्षक ( गुन्हे ) सचिन शिंदे यांचे समक्ष हजर केले असता दोन्ही इसमांनी एम एच बी पोलीस ठाणे हद्दीत , दहिसर , बोरीवली व मुंबईत इतर ठिकाणी घरफोडी करण्याकरिता आले असल्याचे कबुल केले . व जप्त केलेली हत्यारे ही घरफोडी करण्यासाठी स्वत : जवळ बाळगले म्हणून नमुद इसमांची सखोल चौकशी केली असता तसेच त्यांचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्यांचेवर एकुण 35 घरफोडीचे गुन्हे नोंद असल्याचे दिसुन आले .

नमुद अटक आरोपीतांनी संगनमत करून एम एच बी कॉ पोलीस ठाणे हद्दीत एकुण 5 घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले असून , दहिसर गावठाण , दहिसर प . मुंबई याठिकाणाहुन गुन्ह्यातील काही मालमत्ता पोलीसांच्या स्वाधीन केली आहे . तरी तपासदाम्यान एम एच बी कॉ पोलीस ठाणे चे एकुण 05 गुन्ह्यांची उकल झाली असून मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे , तसेच त्यांनी नवी मुंबई , ठाणे , मुंबई मध्ये गुन्हे केल्याचे उघड झाले आहे . सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा . वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप साळवे व पोलीस उपनिरिक्षक अखिलेश बोंबे हे करत आहे . सदरची कारवाई मा . विरेंद्र मिश्रा , अपर पोलीस आयुक्त , उत्तर प्रादेशिक विभाग , मुंबई , मा . विशाल ठाकुर , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ११ , मुंबई , मा . रेखा भवरे , सहा . पोलीस आयुक्त , बोरिवली विभाग , मुंबई व मा . सुधीर कूडाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक , एम एच बी कॉ पोलीस ठाणे , सचिन शिंदे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि संदीप साळवे पथकातील पोह 961391 / शिंदे , पोना 980725 / खोत पो.शि. 140340 / मोरे , पोशि 113194 / आहिरे , पोशि 111518 / सवळी यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button