विविध मागण्या संदर्भात लोकसंघर्ष मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
विविध मागण्या संदर्भात लोकसंघर्ष मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी,नुकसानीचे पंचनामे न झालेल्या भागात त्वरित पंचनामे करण्यात यावे , फेटाळण्यात आलेले वन हक्क दावे त्वरित मंजूर करण्यात यावेत अश्या विविध मागणीसाठी आज लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेत.
मागण्याचे निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना जाऊ दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पंधरा दिवसात शासनाने या मागण्या विषयी निर्णय घेतल्या नाही तर थेट दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याचा ईशारा लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे.