बातम्यामहाराष्ट्र

बुलढाणा – खामगांव येथे आठवडी बाजारात अग्नितांडव ; सात दुकानांचा कोळसा लाखो रुपयांची हानी

बुलढाणा - खामगांव येथे आठवडी बाजारात अग्नितांडव ; सात दुकानांचा कोळसा लाखो रुपयांची हानी

आठवडी बाजारातील एका दुकानाला काल मध्यरात्री बारा वाजेदरम्यान आग लागली. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्वरित खामगाव न. प. अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र काही वेळातच आगिने रुद्ररूप धारण करून बाजुच्या दुकानांनी पेट घेतला. आगीदरम्यान या दुकानात ठेवलेल्या सिलिंडरचे स्फोट झाले. यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले होते. ही आग झपाट्याने पसरत असल्याने नागरिकांनी त्वरित शेगाव व नांदुरा येथील अग्निशमनदलास पाचारण केले. तिन्ही अग्रिशमनदलांनी जवळपास चार तास मेहनत करून पहाटेदरम्यान ही आग आटोक्यात आणली. या भीषण आगीत नंदकिशोर वर्मा यांची नास्त्याची दुकान, हिरालाल छतवानी यांची पानपट्टी, वच्छलाबाई पारसकर यांची भाजीपाल्याची दुकान, अजय बुधवाणी यांची किराणा दुकान, तोलाराम बुधवाणी यांची गॅस शेगड़ी दुकान, कपिल पमनानी यांची इलेक्ट्रिकल दुकान व किशोर केळोदे यांची फुटाण्याची दुकान जळून खाक झाली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान आज सकाळी पंचनामा करण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button