मुंबईत आज 15 हजार नवे कोरोना रुग्ण सापडण्याची शक्यता! टास्क फोर्स सदस्यांचा इशारा
मुंबईत आज 15 हजार नवे कोरोना रुग्ण सापडण्याची शक्यता! टास्क फोर्स सदस्यांचा इशारा
मुंबई- मुंबईत (Mumbai) कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Patients) झपाट्यानं वाढ (rise) होत असून बुधवारच्या (Wednesday) एका दिवसात कोरोनाचे 15 हजार रुग्ण (15 thousand patients) सापडू शकतात, असा इशारा (Warning) देण्यात आला आहे. महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्सचे (Maharashtra Task Force) सदस्य डॉ. शशांक जोशी (Dr. Shashank Joshi) यांनी ट्विट करत ही शक्यता वर्तवली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत ज्या झपाट्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, ते पाहता दैनंदिन रुग्णसंख्या ही 15 हजारांच्या घरात जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. सध्या सलग दोन दिवसांपासून 10 हजारांच्या वर नव्या रुग्णांची नोंद मुंबईत केली जात आहे
Stay safe Mumbai 15K plus cases likely today, Mask completely and Behave Responsibly. If symptoms test and contact your doctor most have mild disease .if vulnerable be cautious and connected .complete vaccination if not done 🙏
— Dr. Shashank Joshi (@AskDrShashank) January 5, 2022
मुंबईत बुधवारच्या दिवसांत 15 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून येऊ शकतील, असं महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यावी आणि घराबाहेर पडताना पूर्ण सुरक्षित असलेल्या मास्कचा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. नागरिकांनी अशा परिस्थितीत जबाबदारीनं वागण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अनेक नागरिक कोरोनाची लक्षणं दिसूनही टेस्ट न करता आजारपण अंगावर काढतात. मात्र हे स्वतःबरोबरच इतरांसाठीदेखील धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे कोरोनाची सौम्य लक्षणं दिसली, तरी तातडीनं कोरोना टेस्ट करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुठलीही लक्षणं दिसली तरी तातडीनं तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि लक्षणांची खातरजमा करून कोरोना टेस्ट करून घ्या, असा सल्ला डॉ. शशांक जोशी यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना दिला आहे.
लसीकरण पूर्ण करा- सध्या कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे ज्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही, त्यांनी तातडीनं लसीकरण करून घेणं गरजेचं असल्याचंही डॉ. जोशी यांनी म्हटलं आहे. कोरोनापासून जास्तीत जास्त प्रभावीपणे स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हाच उत्तम मार्ग असून लवकरात लवकर नागरिकांनी लसीकरण पूर्ण करावं, असा सल्ला त्यांनी दिला आहे.