पुणेमहाराष्ट्रमुंबई
Trending

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 4 मोठ्या हॉटेलवर कारवाई-पुणे

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 4 मोठ्या हॉटेलवर कारवाई-पुणे

पुणे-पुण्यासह संपूर्ण राज्यभरात कोरोनाचे थैमान (Coronavirus spike in Pune) दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाची तिसरी लाट पुण्यात धडकली का? (Coronavirus third wave in Pune?) असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, असे असतानाच पुम्यातील मोठ्या -मोठ्या हॉटेल्समध्ये सुरू असलेल्या पार्टीमध्ये सर्रासपणे कोविड नियमांचे उल्लंघन (Covid norms violation in Pune Hotels) होत असल्याचं दिसून आलं. याची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी चार मोठ्या हॉटेल्सवर धडक कारवाई केली आहे.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

पुण्यातील मुंढवा परिसरात सुरू असलेल्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्ट्यांमध्ये जाऊन पोलिसांनी कारवाई केली. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करुन सुरू असलेल्या धांगडधिंगाला पोलिसांनी रोखलं आणि धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी हॉटेलमधील साऊंड सिस्टम बंद केली आणि कारवाई केली आहे.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

कोविड नियमांचे पानल करण्याच्या संदर्भात हॉटेल्स मालकांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या. हॉटेल मालकांची बैठक घेऊनही कोरोना नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं. तसेच हॉटेल मालकाला वेळोवेळी पोलिसांनी नोटिसा दिल्या होत्या. मात्र, तरीही हॉटेल प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर कारवाई करण्यात आली आहे. मुंढवा पोलिसांच्या पथकाने कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार मोठ्या हॉटेल्सवर कारवाई केली आहे.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होत असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात बुधवारी(5 जानेवारी) 1800 नवीन रुग्णांची नोंद करण्यात झाली आहे. गेल्या काही दिवसांत ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 9 दिवसांपूर्वी दरदिवसाला 80 ते 100 रुग्ण सापडत होते. मात्र आता हा आकडा थेट 1800 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुण्यातही कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर पुणे शहरातील नागरिकांना विनम्र आवाहन केलं आहे.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

राज्यातही कोरोनाचा उद्रेक-महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात 26 हजार 538 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 331 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 96.55 टक्क्यांवर पोहोचलं आहे. मुंबईत काल दिवसभरात तब्बल 15 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात आताच समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील जवळपास 230 निवासी डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या 3 दिवसांत मुंबईतील विविध रुग्णालयांतील एकूण 230 निवासी डॉक्टरांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, जेजे रुग्णालयाचे अध्यक्ष गणेश सोळुंकी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button