बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबई
Trending

शिवसेना-भाजपची पुन्हा युती? अब्दुल सत्तारांच्या विधानावर फडणवीसांनी म्हटलं, ‘नया है वह !’

शिवसेना-भाजपची पुन्हा युती? अब्दुल सत्तारांच्या विधानावर फडणवीसांनी म्हटलं, 'नया है वह !'

मुंबई, : शिवसेना आणि भाजपची युती (Shiv Sena BJP alliance) तुटल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाले. त्याननंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. हे सर्व सुरू असताना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत एक विधान केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या या विधानावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, मला अतिशय आनंद आहे की, अब्दुल सत्तार यांना असं वाटतं की नितीन गडकरी हे करू शकतात. नितीनजी आमचे मोठे नेते आहेत. अब्दुल सत्तार आमचे मोठे नेते आहेत. पण अब्दुल सत्तार… ‘नया है वह’, त्यांना काय माहिती आहे शिवसेनेचं?. काहीच माहिती नाही त्यांना सेनेचं. देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटलं, मला तर असं वाटतं की, ते (अब्दुल सत्तार) कधी… गेल्या पाच सात महिन्यांत… आता तर उद्धवजी आजारी आहेत. त्याच्या पूर्वी पाच सात महिन्यांत उद्धवजींना अब्दुल सत्तार भेटले तरी आहेत का? मला माहिती नाही. महत्वाचं माणूस लागतं ना असं बोलायला.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी न्यूज 18 लोकमत सोबत संवाद साधताना शिवसेना-भाजप युतीबाबत भाष्य केलं आहे. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तर राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येवू शकतात. गडकरी यांचे ठाकरे कुटुंबियांसोबत अतिशय जवळचे नाते आहे.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

नितीन गडकरी ज्येष्ठ नेते आहेत. नितीन गडकरी आणि ठाकरे परिवाराचे जवळचे संबंध आहेत. उद्धव ठाकरे हे सुद्धा नितीन गडकरींचा खूप सन्मान करतात, आदर करातत. यापूर्वीचा इतिहास पाहिला तर नितीन गडकरी यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरेंनी मान्य केला तर प्रश्नच मिटेल असंही अब्दुल सत्तार म्हणाले. आज राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. यात राज्याचे नुकसान होऊ नये. यामुळे नितीन गडकरी यांच्या सारख्या राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला निश्चितच मार्ग निघेल असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button