पुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबई
Trending

माझ्या लेकरांची काळजी घ्या’, माई शेवटच्या क्षणी नेमकं काय म्हणाल्या?

माझ्या लेकरांची काळजी घ्या', माई शेवटच्या क्षणी नेमकं काय म्हणाल्या?

पुणे-सिंधुताई यांना पुण्याच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये 8 वाजून 10 मिनिटांनी हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. सिंधुताई यांचे पार्थिव सकाळी 8 वाजेपासून मांजरी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता ठोसर पागेत त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात येईल. सिंधुताई महानुभाव पंथाच्या अनुयायी असल्याने त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात येईल. तसेच सिंधुताईंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे,

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. ज्येष्ठ शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी प्रसारमाध्यमांना माईंच्या निधनाची बातमी सांगितली. यावेळी काही पत्रकारांनी त्यांना शेवटच्या क्षणी माईंसोबत काही बोलण झालं होतं का किंवा त्या शेवटच्या भेटीवेळी नेमकं काय म्हणाल्या होत्या? असा प्रश्न विचारला. त्यावर सुरेशकुमार वैराळकर यांनी आपलं दोन दिवसांपूर्वी माईंशी बोलणं झाल्याचं सांगितलं. त्यावेळी त्यांनी ज्या हजारो मुलांचं पालकत्व स्विकारलं होतं, त्या मुलांविषयी विचारपूस केली होती. तसेच त्यांची काळजी घेण्याची सूचना केली होती, असं वैराळकर यांनी सांगितलं.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे,

“सिंधुताई यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. माझ्या मुलांचं कसं आहे, त्यांचं सर्व व्यवस्थित सुरु आहे ना, मुलांची व्यवस्थित सोय राहू द्या. शेवट्या क्षणापर्यंत त्यांनी सांभाळलेल्या हजारो मुलांची त्या चौकशी करत होत्या”, अशी प्रतिक्रिया सुरेशकुमार वैराळकर यांनी दिली. सिंधुताई यांच्यावर पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्याभरापासून उपचार सुरु होते. त्यांचं हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. सिंधुताई यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे.

सिंधुताई यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्याच्या भावना संपूर्ण राज्यातून व्यक्त होत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर सिंधुताई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “डॉ. सिंधुताई सपकाळ त्यांनी केलेल्या समाजसेवेसाठी स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुले चांगल्या दर्जाचे जीवन जगू शकली. त्यांनी उपेक्षित समुदायांमध्येही खूप काम केले. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूताईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे,

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनीदेखील सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “वात्सल्यसिंधु, अनाथांच्या आई थोर समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच मला अत्यंत दुःख झाले. त्यांच्या निधनाने समाजाची अपरीमित हानी झाली आहे. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देउन आम्ही त्यांचा गौरव केला होता. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो”, अशा शब्दांत लता मंगेशकर यांनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button