मुंबई-आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेनुसार आज बैठक झाली. या बैठकीत कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपल्याला काय उपाययोजना कराव्या यावर चर्चा झाली. आकडेवारी पाहिली तर तीन दिवसांत रु्गण संख्या दुप्पट होणारी आहे. निश्चितच ही चिंता वाढवणारी बाब आहे. पण यात चांगली बाब असी आहे की, संख्या वाढत असली तरी 90 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीयेत. संख्या वाढत असली तरी 90 टक्के लोकांना लक्षण नाहीत. केवळ 10 टक्के लोकांचं लक्षण आहेत.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली (Increasing number of corona patients in stat has raised concerns) आहे. राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी काय करावं यासाठी एक बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया देत मोठा दिलासा देणारी माहिती दिली आहे.
लसीकरण झालेले सुद्धा बाधित होतात पण त्याची तीव्रता आजिबात नाहीये. त्यामुळे लसीकरण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. लसीकरण करणे गरजेचे आहे. सर्व हेल्थ वर्कर्सचा बुस्टर डोस सध्या शासकीय रुग्णालयात देण्याचा निर्णय होता पण आता आम्ही बुस्टर डोसची सुविधा खासगी रुग्णालयात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे असंही राजेश टोपे म्हणाले.