महाराष्ट्रमुंबई
Trending

निवडणुकीच्या कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

निवडणुकीच्या कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

मुंबई, : शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक काल रात्री पार पडली. या बैठकीत मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा असा आदेश दिला. नुकताच मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराचा निर्णय आपण घेतला तो जनतेपर्यंत पोहोचवा, विकास कामाची पोचपावती जनतेला मिळायला हवी.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे तर माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे या टीकेला मी शांतपणे घेत आहे कारण मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. ज्याला दाखवायचे त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा मी वेळीच माझ्या कामाने माझी पोचपावती देतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले. जनतेची कामं करा आणि जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे असा संकल्प करा. निवडणुका कधीही लागतील तुम्ही तयार रहा..! होर्डिंग बॅनर लावण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहोचण गरजेच आहे. मोठ-मोठी बॅनर लावू नका की जनतेला आवडत नाहीत अशा सूचना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

आता पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याचं कारण म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेलं एक विधान आहे. राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी न्यूज 18 लोकमत सोबत संवाद साधताना शिवसेना-भाजप युतीबाबत भाष्य केलं आहे. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तर राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येवू शकतात. गडकरी यांचे ठाकरे कुटुंबियांसोबत अतिशय जवळचे नाते आहे. नितीन गडकरी ज्येष्ठ नेते आहेत. नितीन गडकरी आणि ठाकरे परिवाराचे जवळचे संबंध आहेत. उद्धव ठाकरे हे सुद्धा नितीन गडकरींचा खूप सन्मान करतात, आदर करातत. यापूर्वीचा इतिहास पाहिला तर नितीन गडकरी यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरेंनी मान्य केला तर प्रश्नच मिटेल असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button