भारतमहाराष्ट्रमुंबई

थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार,राज्यात मिनी लॉकडाऊन होणार?

थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार,राज्यात मिनी लॉकडाऊन होणार?

मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. यामुळे तातडीची पावलं उचलण्याची आवश्यकता असून कठोर निर्बंध (Strict restrictions) लावण्यात येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, टास्क फोर्स आणि इतर अधिकाऱ्यांची एक बैठक सकाळी 9 वाजता पार पडणार आहे. या बैठकीत निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा होईल. (Strict restrictions may impose in Maharashtra)

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यामुळे राज्यात आता कठोर निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्याचीही चर्चा होत आहे. कोरोना बाधितांच्या आकडेवारीला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळीच निर्बंध लावणं आवश्यक आहे. त्याच संदर्भात सकाळी नऊ वाजता मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत इतर मंत्री, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.आज होणाऱ्या बैठकीत कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेच्या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच या कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात अंतिम निर्णय घेतील.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसतोय. पुण्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल 1 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहेत. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे पुण्यात आजपासून मास्कशिवाय कुणी फिरताना दिसलं तर त्याला थेट 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच कुणी मास्क नसताना थुंकताना दिसलं तर त्या व्यक्तीकडून थेट 100 रुपयांचा दंड घेतला जाईल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

“मुंबई आणि पुण्यावर कोरोना संकट मोठ्या प्रमाणात आलं आहे. त्यामुळे पुण्यात आता आजपासून मास्क असेल तर 500 रुपये दंड आणि मास्क नसताना थुंकलात तर 1000 रुपये दंड अशी दंडात्मक कारवाई अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दोन्ही लस ज्याने घेतली नसेल तर कोणतीही हॉटेल, शासनाचे कार्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही. एवढ्या दिवसांपासून आम्ही आवाहन करुनही काही लोकं राहिलेली आहे. कारण जे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत त्यापैकी 36 जणांनी लसच घेतली नसल्याचं समोर आलं आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाला असून मंगळवारी (4 जानेवारी) नव्या 10 हजार 860 रुग्णांची  झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. या रुग्णांसह मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे 8 लाख 18 हजार 462 वर. गेल्या 24 तासांत मुंबईत 834 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 4491 वर पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button