निवडणुकीच्या कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश
निवडणुकीच्या कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश
मुंबई, : शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक काल रात्री पार पडली. या बैठकीत मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा असा आदेश दिला. नुकताच मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराचा निर्णय आपण घेतला तो जनतेपर्यंत पोहोचवा, विकास कामाची पोचपावती जनतेला मिळायला हवी.
मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे तर माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे या टीकेला मी शांतपणे घेत आहे कारण मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. ज्याला दाखवायचे त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा मी वेळीच माझ्या कामाने माझी पोचपावती देतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले. जनतेची कामं करा आणि जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे असा संकल्प करा. निवडणुका कधीही लागतील तुम्ही तयार रहा..! होर्डिंग बॅनर लावण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहोचण गरजेच आहे. मोठ-मोठी बॅनर लावू नका की जनतेला आवडत नाहीत अशा सूचना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत