क्राईममहाराष्ट्रमुंबई
Trending

एअर होस्टेसच्या हत्येतील आरोपीला ८ तासांत अटक

एअर होस्टेसच्या हत्येतील आरोपीला ८ तासांत अटक

श्रीश उपाध्याय/मुंबई

पवई परिसरात एअर होस्टेसच्या हत्येचे प्रकरण अवघ्या ८ तासांत उकलून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पवईतील एनजी हाऊसिंग सोसायटीच्या फ्लॅटमध्ये सोमवारी सकाळी मृतदेह आढळून आला. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रुपल या एअर होस्टेसचा गळा चिरून खून करण्यात आला होता. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी चार पथके तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. काही तासांतच पोलिसांनी सोसायटीत काम करणाऱ्या विक्रम अठवाल याला अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. विक्रमने सांगितले की, काही दिवसांपूर्वी रुपलने त्याच्याकडे चुकीच्या नजरेने पाहिल्याबद्दल त्याला फटकारले होते. याचा राग येऊन विक्रमने रूपलची हत्या केली. विक्रमला अटक केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या सूचनेनुसार पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button