बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा आता सुरू झाली आहे – जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा आता सुरू झाली आहे - जितेंद्र आव्हाड

चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी शाई फेक करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करत एका पत्रकारावर देखील ताब्यात घेतले आहे.. मात्र पत्रकारावर गुन्हा दाखल करणं हे अत्यंत चुकीचं असल्याचे आव्हाड म्हणाले. पत्रकार हा पत्रकारच काम करत असतो. कोणीही जाणूनबुजून करत नाही. आणि सरकारने इतक्या छोट्या मनाच असू नये सरकार मोठ्या मनाचा असला पाहिजे. कारण तुम्ही सत्ताधारी आहात. तुमच्या विरोधात आंदोलन होणार, विरोधात निवेदन येणार आपल्या विरोधात बोललं जाणार.परंतु सरकार ने यावर पाणी सोडून थंड केलं पाहिजे आणि आपण कसे पुढे जायचं हे बघायचं असतं असे आव्हाड म्हणाले. या महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाचे काही आहे की नाही, त्या छायाचित्रकारावर कारवाई करण्यात येते. पत्रकार कुठल्याही गटात नसतात ते आपल काम करत असतात.. माझ्या सोबत देखील असाच घडलं ना जर एका पत्रकाराने महिलेला बाजूला करतानाचा माझा व्हिडिओ काढला नसता तर या विरोधकांनी मला अजून फसवल असतं आणि ते त्यांचे काम आहे. पोलिसांना टार्गेट करण्याचं काय कारण पोलीस काय करणार त्यामध्ये निष्कारण गरीब पोलिसांना आपण अडचणीत आणून कारवाई करतो. माणूसकी तून विचार केला तर आंदोलन करण्याची पद्धत हीच आहे आंदोलन हे जीवावर उधार होऊनच केलं जातं. मी स्वतः एका डॉक्टरच्या अंगावर शाई फेकली होती एका मुख्याध्यापकावर शाई फेकली होती आणि त्यासाठी आपण शरद पवार यांच्या शिव्या देखील खाल्या असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. मात्र आंदोलन असल्यामुळे नाईलाजाने ते करावं लागलं. हा आंदोलनाचाच एक भाग असल्याचे आव्हाडांनी सांगितले.
मुंब्रा येथे माझ्यावर 354 दाखल झाला तेव्हाच लक्षात घ्यायला हवं होत की महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा आता सुरू झाली आहे. पोलिसांच्या हातात आता काहीच राहिलेले नाही. वरून आदेश येतात आणि गुन्हे दाखल होतात. मी वकिलांशी बोललो 307 च्या कुठल्याही घटनेत हा गुन्हा बसतच नाही. आपल्या गावरान भाषेत हत्येचा प्रयत्न म्हणजे 307 असा होतो. पण हा गुन्हा 323 मध्ये पण बसू शकत नाही. उलट हे समाजाला पेटविण्याच आणि महाराष्ट्राला आग लावण्याचं काम केलं जातं आहे. त्यामुळे सरकारने मोठेपणा दाखवून हे गुन्हे मागे घेण्याची विनंती आव्हाड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button