महिलांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यव्यापी दौरा
महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांचा राज्यव्यापी दौरा
भाजपा हां महिला विरोधी पक्ष सुप्रियाताई सुळे यांचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे
मुंबई दि. २३ डिसेंबर
महाराष्ट्राचे आणि देशाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांचा राज्यव्यापी दौरा जानेवारीपासून सुरू होणार आहे. स्थानिक लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. त्यानिमित्त आज अनेक प्रश्नांवर चर्चा करण्याकरिता बैठक बोलवण्यात आली होती असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या की, महिलांवर होणाऱ्या अत्याचार, खासदारांच निलंबन या सर्वांचा आढावा आजच्या बैठकीत रोहिणी ताई खडसे यांनी या सर्वांची माहिती आज आमच्याकडून घेतली आहे. रोहिणी ताई जानेवारीपासून महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहे प्रत्येक जिल्ह्यात रोहिणी ताई जाणार आहे. त्यावेळी महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार याबाबतीत आढावा घेणार आहेत . महाराष्ट्रातील महिलांचे युवकांचे जे महत्वाचे प्रश्न आहे त्याला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने महाराष्ट्रातल्या या सक्षम कर्तृत्ववान महिलांच्या बाजूनी उभा राहणार आहे. कारण आज राज्यात आणि केंद्र सरकार अन्याय महिलांवर खासदारांवर करत आहे. नवीन कायदे आणलेले आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे. आता जे नविन कायदे आणले आहेत. त्यामुळे उदाहरणार्थ टेलिकॅाम कायदा आणला त्यामुळे कोणाचेही फोन टेप करता येणार आहेत. त्यामुळे प्रायव्हसी पूर्णपणे संपुष्टात येणार आहे असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या आहेत.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन पोहोचली आहे. राज्यातील महिलांचे प्रश्न घेऊन रोहिणीताई राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहे यामध्ये महिलांचे प्रश्न देखील समजून घेण्यात येतील आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहणार आहे. सध्या राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी महिलांवर होणारे अत्याचार अन्याय आणि बेरोजगारी या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता हा राज्यव्यापी दौरा असणार आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था विकत झालेली आहे. गुन्हेगारी संदर्भातील आकडेवारी समोर आली असून हे अतिशय चिंताजनक महाराष्ट्रासाठी बाब आहे. सध्या आकडेवारीनुसार राज्यात महिला वरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
इंडिया आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाही आहे. सगळीकडे समन्वय आहे. उद्धवजी आले होते. नितीशजी आले होते. सगळे आले होते. समन्वय आहे. लवकरात लवकर इंडिया आघाडी मधील जागावाटप जाहीर होणार आहे दिल्लीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे १५ ते २० दिवसात जागावाटप निश्चित होणार आहे. संविधान वाचविण्याची वेळ आलीय.ज्या लोकांनी आपले बलिदान आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणून दिले आहे. त्या संविधानाला वाचविण्याचे काम आपल्याला करणे गरजेचे आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाले की, गडकरी साहेब हे जेष्ठ आहेत. त्यांच्या बद्दल मला आदर प्रेम आहे. ते ओरीजनल भाजपचे आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाबद्दल आत्मियता वाटते. जे बोलतात ते खरेच बोलतात. भुजबळ साहेब वयाने मोठे आहे. ते जर तुमच्या समोर हे मांडत असतील ते हतबल आहेत. ते दुखी आहेत. त्यांचे म्हणणे कॅबिनेटमधे ऐकले जात नसेल त्यामुळे त्यांनी त्यांचे दुःख मांडले असेल.
इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी आघाडीतील राजकीय पक्षातील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणे कडून नोटीस येतात हे आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर यावरून दिसून येते आहे मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर विरोधकांना अडचणीत आणण्याकरिता करण्यात येत आहे संजय राऊत यांनी देखील यापूर्वी म्हटले आहे की ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय यांना बाजूला ठेवून निवडणुका घ्या विरोधकांना दाबण्यासाठी केवळ केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाले की , मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने मार्ग काढला पाहिजेत सरकारने शब्द दिला आहे. तो त्यांनी पूर्ण करावा. त्यांच्याकडे काही तरी असेल. असे मला वाटते असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.