बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

उद्योजक व्यापाऱ्यांना सरकारचे पूर्णपणे सहकार्य – आयुक्त ओमप्रकाश दिवटे

महाराष्ट्र चेंबर ची कार्यकारणी सभा इचलकरंजीत उत्साहात संपन्न

इचलकरंजी :

राज्य सरकारच्या विविध योजना विना विलंब उद्योजक व्यापार्‍यांपर्यंत पोहोचविल्या जातील. उद्योगांच्या सर्वांगीण वाढीसाठी उद्योजक व्यापाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य राहील, अशी ग्वाही इचलकरंजीचे नूतन महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एग्रीकल्चर ची तेरावी कार्यकारणी समितीचीच्या सभेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी होते. इचलकरंजी येथील कल्लाप्पा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही सभा झाली.

कल्लाप्पा आवाडे जनता सहकारी बँक इचलकरंजीचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे, जवाहर साखर कारखान्याचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, महाराष्ट्र बँक फेडरेशनच्या उपा ध्यक्षा वैशाली आवाडे यांच्यासह राज्यभरातून आलेल्या चेंबरच्या सदस्यांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. विषय पत्रिकेतील सर्व विषय खेळीमेळीत पार पडले

आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले, राज्य सरकारच्या सर्व योजना व्यापारी उद्योजकांपर्यंत पोहोचवल्या जातील युवकांना रोजगार मिळवण्यासाठी मनपा आणि उद्योजका तर्फे संयुक्तपणे प्रयत्न केल्यास बेरोजगारीचा टक्का कमी होईल त्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सहकार्य अत्यंत गरजेचे आहे.

कल्लाप्पा आवाडे जनता सहकारी बँक इचलकरंजी चे अध्यक्ष स्वप्निल आवाडे म्हणाले इचलकरंजी आणि उद्योगाचे अतूट नाते आहे. तत्कालीन काळात माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांनी उद्योग वाढीसाठी दूरदृष्टीने अनेक निर्णय घेतले. त्यामुळेच इचलकरंजी चे नाव जगात टेक्सटाईल सेंटर म्हणून ओळखले जाते मॉडर्न लूमसाठी इचलकरंजी प्रसिद्ध आहे आहे. टेक्स्टाईल पार्कची उभारणी इचलकरंजीत झाली आहे. सरकारच्या विविध योजना आणून तळागाळापर्यंत पोहोचवल्या उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा मोठा वाटा आहे . महाराष्ट्र चेंबर चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांनी घालून दिलेल्या आदर्श आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीचे काम व्यापार उद्योजक करत आहेत.

..2

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे त्यासाठी महाराष्ट्र चेंबर कॉमर्स चे मोठे योगदान आहे आणि भविष्यात पुढे सातत्याने राहणार आहे महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात क्रमांक एकवर आणण्यासाठी सर्वच व्यापारी आणि उद्योगांचा मोलाचा वाटा आहे इचलकरंजी शहराचेही राज्याच्या औद्योगिक विकासात मोठे योगदान योगदान आहे महाराष्ट्र चेंबरने केंद्र आणि राज्य सरकारला दिलेली धोरणे आणि अहवालाचा मोठा फायदा झाला. सरकारने चेंबरच्या मदतीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या विकासासाठी घेतले आहेत.

यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते नूतन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचा सत्कार झाला व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा, चेंबरचे उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, शुभांगी तिरोडकर, तनसुख झांबड, करुणाकर शेट्टी , माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर आदी उपस्थित होते.

इचलकरंजीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य नितीन धूत, मयूर शहा यांनी संयोजन केले. उपाध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी सूत्रसंचालन केले.

 

चौकट

पेट्रोन सभासदांचा सत्कार

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते चेंबरची पेट्रोन मेंबरशिप घेणारे मुकेश खाबनी सुरेंद्र कुमार छाजेड आनंद मित्तल दिलीप गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला

 

चेंबर पदाधिकाऱ्यांचा सत्कार

महाराष्ट्र चेंबरचे नूतन अध्यक्ष ललित गांधी यांचा आणि इचलकरंजी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांचा वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा यांचा आणि विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर यांचा सांगली जिल्ह्याच्या वतीने सर्जेराव नलवडे रामानंद पाटील श्रीराम माने यांच्या असे सत्कार करण्यात आला

अध्यक्ष ललित गांधी यांनी उत्तर महाराष्ट्र विभागात उपाध्यक्षपदी नाशिकचे कांतीलाल चोपडा व धुळ्याचे नितीन बंग तसेच कोकण विभागात श्रीकृष्ण परब यांची निवड केल्याचे जाहीर केले व उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन पदी संजय सोनवणे यांची निवड केली

 

फोटो ओळी

1. महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारणी सभेत मार्गदर्शन करताना अध्यक्ष ललित गांधी

2. महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारणी सभेत प्रमुख पाहुणे इचलकरंजीचे नूतन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचा सत्कार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते झाला. यावेळी उपस्थिततात डावीकडून माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा , वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा, कलाप्पा आवडे बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, राहुल आवाडे, आशिष पेडणेकर वैशाली आवाडे, रवींद्र मानगावे आदी मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button