करमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

जुन्या गाण्याच्या चालीवर ज्येष्ठ नागरिक थिरकले

कुर्ला पोलीस ठाण्याचा अनोखा उपक्रम

ज्येष्ठांचा सन्मान हिच शान” हे ब्रीद घेऊन कुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुर्ला पश्चिम कच्छी विसा हॉल येथे आयोजित संगीत कार्यक्रमात प्रत्येक गाण्यास दाद तर दिली आणि जुन्या गाण्याच्या चालीवर ज्येष्ठ नागरिक थिरकले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र होवाळे तसेच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर व अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्नेह संमेलनात स्थानिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. गुलाब पुष्प देऊन सर्वाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्वप्रथम सर्व नागरिकांच्या आरोग्याची विचारणा करण्यात आली. तसेच या वयामध्ये आपणास होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाबाबत विचारपूस करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक अण्णा प्रभूदेसाई यांचे स्वागत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले. तसेच 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक दिलीप सराटे मास्तर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. साज और आवाजचे संयोजक आणि गायक अशरफ खान यांच्या नेतृत्वाखाली अजिता मेस्त्री, मकबूल खान, मिलिंद धोत्रे, मयूर रोडगे, जितेंद्र सायगांवकर, अभिजीत पवार, प्रवीण या टीमने अप्रतिम जुनी गाणी मराठी व हिंदी भाषेत सादर केली. सूत्रसंचालन चेतन कोरगांवकर यांनी केले. यावेळी वीरचंद विसारिया, गणेश चिकणे, रघुनाथ वाघमारे, लखु पटेल, राजेश शेट्टी, डेनीयल त्रिभुवन उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button