बातम्यामहाराष्ट्र
Trending

समृद्धी महामार्ग पाहणीदौर्यात मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

समृद्धी महामार्ग पाहणीदौर्यात मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

जालन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शेतकर्यांनी काळे झेंडे दाखवलेत.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. जालन्यातही जामवाडी येथे पाहणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच शेतकर्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आलेत. यावेळी छत्रपतींचा अवमान करणार्या राज्यपाल हटावच्या जोरदार घोषणा देण्यात आल्यात.तर शेतकर्यांची वीज कट केल्यानं मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्यात. यावेळी काळे झेंडे दाखवणार्यांना पोलिसांनकडून अडवत त्यांच्याकडील काळे झेंडे हिसकावण्यात आलेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button