‘धर्मवीर-२’ चित्रपटाच्या मुहुर्ताचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांच्या संस्कारानुसार जनतेचे भले करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे दि.२७ :- सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्यांचेच आम्हीही अनुकरण करीत आहोत. त्यांनी दिलेल्या संस्कारानुसार आपल्या हातून जनतेचे भले होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ‘धर्मवीर-२’ या चित्रपटाच्या मुहूर्त शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, मुख्य कलाकार प्रसाद ओक, मंगेश कुलकर्णी, चित्रपटाची निर्मिती टीम व कलाकार उपस्थित होते.
‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. धर्मवीर स्व.आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्व स्तरातील घटकांचे कल्याण केले, ते सर्वांसाठी जगले.