बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेहरुनगर येथे रक्तदान शिबिर

शिवसेना विभाग क्र.६ कुर्ला – कालिना विधानसभेचे विभागप्रमुख डॉ.महेश पेडणेकर यांच्या संकल्पनेतून हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुर्ला (पूर्व) नेहरूनगर येथील शिवसेना शाखा क्र.169 येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माहिती अधिकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पत्रकार अनिल गलगली यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यामध्ये 176 जणांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले.

या शिबिराला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, पराग डाके, कालिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस, महिला विभाग संघटक अश्विनी मते, कुर्ला विधानसभा संघटक दिलीप शिंदे, महिला विधानसभा संघटक हर्षदा परब, उपविभाग प्रमुख बळीराम घाग,संदीप गावडे, महिला उपविभाग संघटक साधना डाळ, माजी नगरसेवक सगुण नाईक,दिनेश कुबल, अनुराधा पेडणेकर, भारतीय कामगार सेना चिटणीस प्रकाश नाईक, शिव आरोग्य सेनेचे जितेंद्र सकपाळ, युवा सेना महाराष्ट्र सहसचिव अमित रामचंदानी, मनराज प्रतिष्ठानचे ट्रस्टी मनोज नाथांनी यांच्यासह विभागातील सर्व आजी माजी पदाधिकारी शाखाप्रमुख आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवेंद्र कुर्टे, अमृता मेहता, हर्षदा लगारे,प्रिया तेंडुलकर, चेतन कोरगावकर, सिद्धेश्वर सोनवणे, फारुख गोलंदाज यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button