अमली पदार्थांच्या व्यसनामुळे पालकांनी मुलांना विकले
गुन्हे शाखे 9 ने पकडले
श्रीश उपाध्याय
मुंबई
नशेच्या आहारी गेलेल्या पालकांनी आपल्याच नवजात बालकांना विकल्याची हृदयविदारक घटना समोर आली आहे.
नोव्हेंबर महिन्यात पोलिसांनी बेपत्ता मुलांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेंतर्गत काम करत असताना एका पालकाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना नशेचे व्यसन पूर्ण करण्यासाठी विकल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा 9 ला मिळाली.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांना असे समजले की, मादक पदार्थांच्या व्यसनाधीन पालकांनी आपल्या दोन वर्षांच्या मुलाला 60 हजार रुपयांना आणि दोन महिन्यांच्या मुलीला 14 हजार रुपयांना विकले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी दोन महिन्यांच्या मुलीला ताब्यात घेतले आणि मुलीला विकत घेणाऱ्या व्यक्तीसह पालकांना अटक केली.
या दोन वर्षांच्या मुलाची पालघरमधील आंतरराज्यीय मुले खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीला विक्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अधिक तपास करत असताना पोलिसांनी अन्य 5 आरोपींनाही अटक केली असून यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुष आहेत.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर
पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन, सहायक पोलिस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखे 9चे प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक, पोलिस निरीक्षक सचिन पुराणिक, पोलिस निरीक्षक दीपक पवार, सहायक पोलिस निरीक्षक उत्कर्ष वाझे, महेंद्र पाटील व पथकाने वरील कारवाई केली आहे.
नोट:-
पोलीस तपासात कोणताही गोंधळ होऊ नये, हे लक्षात घेऊन आरोपींची नावे प्रसिद्ध केलेली नाहीत.