मुख्य आणि राज्य माहिती आयुक्तांच्या रिक्त पदासाठी जाहिरात जारी
मुख्य सचिवांची अनिल गलगली यांनी भेट घेतली
मुंबई
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेत मुख्य आणि राज्य माहिती आयुक्तांच्या रिक्त पदाबाबत निवेदन देताच मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी तत्काल कार्यवाहीचे आदेश जारी करताच जाहिरात जारी झाली.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची भेट घेत महाराष्ट्र राज्य माहिती आयोग अंतर्गत मुख्य माहिती आयुक्त आणि 3 राज्य माहिती आयुक्त पद भरणे तसेच अजून 3 माहिती आयुक्त खंडपीठाची स्थापना करण्याबाबत लेखी निवेदन होते.
निवेदनात अनिल गलगली यांनी नमूद केले की सद्यस्थितीला 1 लाखांहून अधिक अपील तर 7 हजार तक्रारी प्रलंबित आहे. सद्यस्थितीला मुख्य माहिती आयुक्त आणि 6 राज्य माहिती आयुक्त खंडपीठ असून अपिलांची संख्या लक्षात घेता अजून 3 माहिती आयुक्त खंडपीठाची स्थापना करणे आवश्यक आहे जेणेकरुन अपिलांची विभागणी समसमान होईल. यामुळे अपील निराकरण तत्काळ होईल आणि नागरिकांना जलद माहिती मिळेल. परंतु महाराष्ट्र राज्य माहिती आयोग अंतर्गत मुख्य माहिती आयुक्त आणि 3 राज्य माहिती आयुक्त पद रिक्त आहे. सद्या मुख्य माहिती आयुक्त तसेच कोकण, औंरगाबाद आणि अमरावती येथील राज्य माहिती आयुक्त पद रिक्त आहे.