श्रीश उपाध्याय
मुंबई
MHB पोलिसांनी बोरिवली पश्चिम येथून 7,57,500 रुपयांच्या चरससह दोन आरोपीला अटक केली आहे.
25 ऑक्टोबर रोजी बोरिवली पश्चिम येथे कोणीतरी चरस विकण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दीपक सिंग याला ५०५ ग्रॅम चरससह अटक केली. पोलिसांनी दीपककडे चौकशी केली असता दीपक हा बिहारच्या असगर अली हुसेन कुरेशी याच्याकडून चरस आणून मुंबईत विकायचा, असे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास करत असगरला बिहार येथून अटक केली.
असगर कुरेशी
दीपक सिंह
अपर पोलिस आयुक्त राजीव जैन,
पोलीस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक अखिलेश चौबे व एमएचबी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे