श्रीश उपाध्याय
मुंबई
मुंबई क्राईम ब्रँच 5 ने पंजाबमधून फरार झालेल्या दोन गुंडांना मुंबईतील कुर्ला परिसरातून अटक केली आहे.
पंजाबमधील जालंधरमधून अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुंड फरार झाले होते. मुंबईच्या क्राईम ब्रँच 5 ने दोन्ही आरोपींना कुर्ल्यातील हॉटेलमधून अटक केली आहे. पंचमनूर सिंग आणि हिमांशू माटा या दोन्ही आरोपींना पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई गुन्हे शाखा 5 चे प्रभारी पोलिस निरीक्षक घनश्याम नायर, पोलिस निरीक्षक अजित गोधडी , हवालदार नितेश विचारे , हरेश कांबळे , कॉन्स्टेबल गणेश काळे आणि पथकाने
केले आहे.