मुंबई
बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समर्थकांबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी एका भाजप कार्यकर्त्याला तुरुंगात टाकले आहे.
साईबाबा रोड पाईप लाईन खार पूर्व येथील रहिवासी भाजप तालुकाध्यक्ष लोकेश दवे यांनी बाबा साहेब आंबेडकर व त्यांच्या समर्थकांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्द वापरला होता. या प्रकरणाचा आक्षेप घेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव यांनी वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून निर्मल नगर पोलिसांनी सोमवारी लोकेश दवे विरुद्ध एफआयआर क्रमांक 0545 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
दवे यांच्यावर भाजपकडून कारवाई होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, कोणत्याही कार्यकर्त्याने चुकीचे काम केले तर पक्ष त्याच्यावर नक्कीच कारवाई करेल.