इंडिया आघाडीचं नाव हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
मुंबई
जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी आज पत्रकारांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. तर यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा आहे यावर मत विचारले असता शरद साहेबांनी थेट केंद्र सरकारच निशाणा साधला.
केंद्र सरकारने येत्या 18 सप्टेंबरपासून बोलवलेल्या विशेष अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयके मांडणार आहे. या अधिवेशनात भारतीय संविधानातून इंडिया शब्द हटवण्यासाठीही विधेयक मांडले जाणार असल्याची चर्चा आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयक आणून केंद्र सरकार इंडिया आघाडीतील INDIA हा शब्द बदलण्याच्या तयारीत आहे. यावर बोलताना शरद पवार साहेब यांनी केंद्र सरकारला खुले आव्हान दिले असून कुणीच हे नाव बदलू शकत नाही तसा अधिकारच कुणाकडे नाही असेही शरद पवार साहेब म्हणाले.
इंडिया आघाडीच्या नाव बदलण्याच्या विधेयकाच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार साहेब म्हणाले की मला तशी काही माहिती नाही. उद्या मल्लिकार्जून खर्गे यांनी बैठक बोलावली आहे. इंडिया बैठकीत सहभागी झालेले पक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांची उद्या बैठक आहे. या बैठकीत या गोष्टींचा विचार होईल. पण हे नाव हटवण्याचा आधिकार कोणालाही नाही. कोणीही नाव हटवू शकत नाही देशाशी निगडीत असलेले नावांबाबत अस्वस्थता सत्ताधारी पक्षांना का असते हे मला समजतं नाही असे म्हणत शरद पवार साहेबांनी थेट पंतप्रधानांवरच निशाणा साधला.