आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी एनडीएला मागे टाकेल
राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे
मुंबई-
इंडिया टुडे सी वोटरने नुकताच केलेल्या सर्वे अनुसार इंडिया आघाडी आणि एनडीए मध्ये दोन टक्के मतांचा फरक शिल्लक राहिला आहे.
देशातील जनतेचा मूड आता बदलला आहे. भाजप विरोधात देशातील जनतेचे मत तयार झाले आहे. देशात इंडिया आघाडीला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आगामी 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी एनडीए पेक्षा 10 टक्के अधिक असेल असा विश्वास राष्ट्रवादीचे मुख्य प्रवृत्ती महेश तपासे यांनी प्रसारमाध्यमांची बोलताना व्यक्त केला.
तपासे पुढे म्हणाले विविध पुरोगामी पक्षांचा समावेश असलेली इंडिया आघाडीला आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश मिळणार असून एनडीए आघाडी मागे पडणार आहे. देशातील जनतेमध्ये भारतीय जनता पार्टी विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला आहे. भाजपने ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशांमध्ये इतर पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण घडवून आणले त्याला देशातील जनतेचा आक्षेप आहे.
आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदानातून जनता धडा शिकवणार आहे असेही तपासे पुढे म्हणाले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ज्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने कट कारस्थान करून सरकार पाडण्यासाठी डावपेच केले व शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना सरकारमध्ये समाविष्ट करून घेतलं हे महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही आणि म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार लोकशाही मार्गाने भारतीय जनता पार्टीला धडा शिकवणार आहे.
जनतेमध्ये इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि जनता भरभरून इंडिया आघाडीच्या पाठीमागे उभी असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात व देशात दिसत आहे.