परीक्षा होऊन हि बी.एड चा निकाल नाही;
लवकरात लवकर निकाल लावा अन्यथा संचालकांना घेराव घालू ,राष्ट्रवादीचा कुलगुरूंना इशारा
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी यांना ईमेल द्वारे पत्र
मुंबई
प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठातील ‘बी.एड’ अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय सत्राची परीक्षा होऊन पाच महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही निकाल रखडले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते अॅड. अमोल मातेले यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना निकाला संदर्भात ई-मेलद्वारे विचारणा केली आहे.
मुंबई विद्यापीठातील ‘बी.एड’ अभ्यासक्रमाच्या निकाल न लागल्यामुळे विद्यार्थी चितेंत असून आपले शैक्षणिक वर्ष वाया जाणार का ? या चिंता त्यांना भेडसावत आहेत. दम्यान परीक्षा मंडळाला व विद्यापीठ अधिकार्यांना या बाबत विचारले असता याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचे ते सांगत आहेत. तसेच चौथ्या सत्राची परीक्षा अजूनही जाहीर झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून लवकरच चौथ्या सत्राची परीक्षा घेण्यात यावी.असे अॅड. मातेले म्हणाले.
याबाबत अॅड.अमोल मातेले यांनी याप्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरूंना ईमेल द्वारे पत्र पाठवून ‘बी.एड’ अभ्यासक्रमाचा निकालाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा परीक्षा मंडळ व संचालकाला घेराव घालण्यात येईल असा इशारा दिला आहे.