बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ

 

मुंबई, दि. 4 :

राज्यपाल रमेश बैस यांच्या पूजेनंतर मंगळवारी (दि. ४) राजभवनातील एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी देवीची आरती केली तसेच भाविकांशी संवाद साधला.

आरतीनंतर राज्यपालांनी परिसरातील महालक्ष्मी, दुर्गा, महादेव व हनुमान यांच्या मूर्तींना हार घातला व आपल्या वतीने प्रसाद अर्पण केला. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनात एक दिवसाची यात्रा भरते. राजभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button