राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य समता दिंडी
जि. प. ठाणे येथे आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन साजरा
विजय कुमार यादव
ठाणे
जून २०२३
आरक्षणाचे जनक, रयतेचा जाणता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे, यशवंतराव चव्हाण सभागृहात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नशा मुक्ती व समता दिनांचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. तसेच यांची अंमलबजावणी आपण सर्वांनी केली पाहिजे. आपल्या महाष्ट्रात अनेक थोर लोकांनी आपल्याला शिकवण दिली आहे तो वारसा पुढे घेऊन जाणे आपले धेय असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन समाज कल्याण विभाग प्रमुख मा. श्री. संजय बागुल यांनी केले.
सदर कार्यक्रमात शिक्षणाधिकारी श्रीम. ललिता दहितुले म्हणाले, स्त्री मुक्ती व समतेसाठी महाराजांनी मोलाची कामगिरी केली. स्वताः कामात त्यांची अंमलबजावणी करत त्यांनी कार्य केलं. त्यांना आज वंदन करून सर्वांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते.
तसेच “आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन” साजरा करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यीं मार्फत प्रचार फेरी जिल्हा परिषद ठाणे ते जिल्हाधिकारी कार्यालय येथील छत्रपती शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण करून समाप्त करण्यात आले. जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नशा बंदीचे घोषणा देत केली तसेच नशा बंदी संदर्भातील फलक दाखवून माहिती देण्यात आली. नशा मुक्तीसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकिय कार्यालयात “नशा मुक्त भारत पंधरवडा” १२ जून २०२३ ते २६ जून २०२३ रोजी या पंधरा दिवसात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी चित्र, नाटक, पथनाट्य, घोषना देत जनजागृती मोहिम राबविण्यात आली.
यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री मनुज जिंदल, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीम. ललिता दहितुले, समाज कल्याण विभाग प्रमुख श्री. संजय बागुल, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री गंगाधर परगे तसेच शालेय विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.