उद्याचा दिवस हा ‘पन्नास खोक्यांचा’ … उद्याचा दिवस हा’ ‘पलायन दिवस’…’ गद्दार दिवस’ त्यामुळे तो घराघरात साजरा केला जाणारच – जितेंद्र आव्हाड
आताचे जे सर्व्हे सुरु आहेत तो एक खेळ झाला आहे...
अहो, यांना साधी सीट मिळाली नाही .त्यांना एवढ्या गुप्त गोष्टी सांगणार आहेत का?बावनकुळेंवर जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा…
हिंदूत्ववाल्यांना जर राम मान्य असेल तर ठीक आहे; ‘आदिपुरुष’ सिनेमामधील डॉयलॉगवरुन जितेंद्र आव्हाड संतप्त…
मुंबई
दि. १९ जून –
‘गद्दार दिवस’ हा निव्वळ राष्ट्रवादीकडून नाही तर घराघरात साजरा केला जाणार आहे. हा एकच असा प्रसंग महाराष्ट्रात घडला आहे, जो लोकांच्या घराघरात गेला आहे. ‘पन्नास’ म्हटले की लगेचच लहान पोरगाही ‘खोके’ म्हणतो. उद्याचा दिवस हा ‘पन्नास खोक्यांचा दिवस’ आहे… उद्याचा दिवस हा’ ‘पलायन दिवस’ आहे…’ गद्दार दिवस’ आहे त्यामुळे तो घराघरात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जाणारच आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केली.
‘गद्दार दिवस’ हा निव्वळ राष्ट्रवादीकडून नाही तर घराघरात साजरा केला जाणार आहे. हा एकच असा प्रसंग महाराष्ट्रात घडला आहे जो लोकांच्या घराघरात गेला आहे. ‘पन्नास’ म्हटले की लगेचच लहान पोरगाही ‘खोके’ म्हणतो याची आठवणही जितेंद्र आव्हाड यांनी करुन दिली.
माझ्या अंदाजाने सहानुभूती उध्दव ठाकरे यांना मिळतेय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातही उध्दव ठाकरे यांच्याबद्दल लिहिण्यात आले आहे त्यावरुन साहजिकच महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा हा उध्दव ठाकरे असणार आहेत असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कोण कुठे जातंय हे महत्वाचे नाही. सर्वसामान्य शिवसैनिक हा कुणाबरोबर आहे हे फार महत्त्वाचे आहे. १९९२ साली अशीच शिवसेना फुटली होती. जेव्हा फुटली त्यावेळी अशीच हालचाल होती त्यानंतर फुटलेल्यांपैकी एकही माणूस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटावर दिसला नाही हेही आवर्जून जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
आता नवीन सर्व्हे आला आहे मी तो करुन घेतला आहे त्यात ९९ टक्के लोक मलाच तुम्ही मुख्यमंत्री होणार असे बोलत आहेत. आताचे सर्व्हे हे हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट झाली आहे. असे दिवसाकाठी चार सर्व्हे होतात की काय? …आताचे जे सर्व्हे सुरु आहेत तो एक खेळ झाला आहे. एकनाथ शिंदे २६ वर तर फडणवीस २३ वर मी ९९ वर…असा मिश्किल टोला लगावतानाच माझ्या अंदाजानुसार २८८ पैकी २८५ जागा शिंदे – फडणवीस यांना मिळतील. एक माझी मिळणार नाही बाकी मला माहीत नाही असेही जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
सर्व्हेतून खालच्या कार्यकर्त्यांना ज्यांना माहीत आहे की, लोकं आपल्याबरोबर नाहीत आपल्याला प्रतिसाद मिळत नाहीय. मी जितक्या गावांमध्ये, शहरांमध्ये जातोय तिथे क्लीअरकट लोकं जे काही बोलायचे ते बोलून दाखवत आहेत. हेच बोलणं मंत्रालयातही ऐकायला मिळत आहे. त्यामुळे काही करुन, कसेही करुन लोकांच्या मनात टाका… सगळं सुरळीत आहे आणि पुढचे सत्ताधारी पण हेच आहेत. तुम्ही काळजी करू नका असे बिंबवण्याचा प्रयत्न सुरू आहे मग जमवाजमव करायला पण सोपं जातं ना असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांना बंड होणार हेसुद्धा माहित नव्हते. अहो यांना साधी सीट मिळाली नाही .त्यांना एवढ्या गुप्त गोष्टी सांगणार आहेत का? आणि एवढी आकलनशक्ती आहे का त्यांच्यात की शरद पवारसाहेबांच्या मनात काय सुरु आहे. शरद पवारसाहेब यांच्या मनात काय आहे हे त्यांचे घरचे सांगू शकत नाही तर बावनकुळे काय सांगणार आहेत असा जोरदार टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी बावनकुळे यांना लगावला.
इंदिरा गांधी यांचा १९७७ चा इतिहास बघितला तर ७७ ते ८० मध्ये इंदिरा गांधींना जवळपास सगळेच सोडून गेले होते पण त्या काळात काश्मीरचा माणूस गुलामनबी आझाद वाशीममधून निवडून आणला होता. त्यामुळे आमदार सोडून गेल्याने काही होत नसते, शेवटी जनता ठरवते काय करायचं ते, आमदारांच्या हातात काय नसतं. जे जात आहेत ते ठीक आहे उलट नवीन मुलांना संधी मिळते त्यात काय वाईट आहे असा प्रतिसवालही जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना केला.
‘मेरी भी जलेगी, तेरी भी जलेगी, तो तेरे बाप की भी जलेगी’ … हा डॉयलॉग हिंदूत्ववाल्यांना जर राम मान्य असेल तर ठीक आहे. मात्र माझ्यासारखा रामभक्त प्रचंड दुखावला गेला आहे. ‘जय सियाराम’ म्हणणारे आम्ही लोक आहोत. रामाला हृदयात ठेवणारी आम्ही माणसं आहोत. त्या रामाला तुम्ही जॅकेट घालून फार रस्त्यावरील टपोरी गँगस्टर बनवून टाकला आहे. मनोज मुंतशीर हा लेखक स्वतः ला हिंदूत्ववादी समजतो मग एखाद्या हिंदुत्ववाद्याकडून इतके घाणेरडे डायलॉग की त्याचा पुढे मागे काही आगेपिचा नाही. ज्या कलाकृती निर्माण केल्या आहेत त्यांचे चेहरे इतके विद्रूप दाखवले आहेत. रामाचा चेहरा पूर्वी इतका सोज्वळ, प्रेमळ चित्रकाराने रेखाटला तितक्याच प्रेमाने हनुमान त्यांच्या पायाजवळ नमस्कार करताना होता. परंतू या चित्रपटात काय आहे कळतच नाही असे भाष्य जितेंद्र आव्हाड यांनी आदिपुरुष या सिनेमाबद्दल केले.