सिंधुरत्न समृद्धी योजनेतील प्रलंबित कामे लवकरच लागणार मार्गी – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
सिंधुरत्न समृद्धी योजनेतील प्रलंबित कामे लवकरच लागणार मार्गी - वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
सिंधुरत्न समृध्दी योजनेतील प्रलंबित कामे लवकरच लागणार मार्गी लावण्यासाठी सर्व यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करावी असे निर्देश वने राज्यमंत्री दतात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालयातील दालनात सिंधुरत्न समृध्द योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठकीत वने राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. या बैठकीला माजी राज्यमंत्री दिपक केसरकर,अप्पर मुख्य प्रधान वन सरंक्षक विरेंद्र तिवारी, बांबु संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब,कोल्हापूर चे प्रधान मुख्य वनसंरक्षक आर. एफ.रामानुजन, मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त महेश देवरे,उपसचिव वने भानुदास पिंगळे या बैठकीला उपस्थित होते.
वने राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले,सिंधु रत्न योजनेतंर्गत मत्स्यव्यवसाय, वने व वनोत्पादन, औषधी वनस्पती या प्रस्तावित कामांबाबत कार्यान्वयीन यंत्रणानी आपल्या कार्यक्षेत्रातील कामे पूर्ण करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. बांबू संग्रहालय दुरूस्ती, तोंडवली वन उद्यान दुरूस्ती,अंबोली येथील फुलपाखरू उद्यान तसेच या मत्स्यव्यवसाय विभागातंर्गत पिंजरा पध्दतीने मत्स्यव्यवसाय,कोळंबी बीज उत्पादन ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना राज्यमंत्री श्री. भरणे यांनी बैठकीत केल्या.
सिंधुरत्न योजनेची कामे गतीने करावीत – आमदार दिपक केसरकर
माजी राज्यमंत्री दिपक केसरकर म्हणाले, सिंधु रत्न योजनेतंर्गत मत्स्यव्यवसाय,वने व वनोत्पादन,औषधी वनस्पती विकासासाठी सिंधुरत्न योजनेतील प्रस्तावित कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी संबधित विभागांकडून कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यस्तरीय मान्यता घेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी आमदार दिपक केसरकर यांनी बैठकीत केली.