ताब्यातून फरार झालेला हिस्ट्री शीटरला 12 तासात पोलिसांनी केली अटक
मुंबई क्राइम ब्रँच आणि हफ्ता विरोधी टीमची कारवाई
आर्या न्यूज
मुंबई
एका खटल्याच्या सुनावणीनंतर मुंबईतून अमरावती कारागृहात नेत असताना फरार झालेल्या हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराला मुंबई क्राइम ब्रांच- पोलिसांच्या हफ्ता विरोधी पथकाने १२ तासांत पकडले.
एका खटल्याच्या सुनावणीसाठी हिस्ट्रीशीटर गुंड गणेश शिंदे यांना बुधवारी मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर पोलीस गणेश शिंदे याला रेल्वेने अमरावतीला घेऊन जात होते. मनमाडजवळ पोलिसांना चकमा देऊन गणेश शिंदे फरार झाला. गणेशवर 16 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांची धावपळ उडाली. मुंबई क्राइम ब्रांच आणि पोलिसांच्या हफ्ता विरोधी पथकाने त्याला १२ तासांत सायन परिसरातून अटक केली आहे.
सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अप्पर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र लोटलीकर,यांच्या सूचनेनुसार मुंबई पोलिस हफ्ता विरोधी दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गदोरे,पोलिस निरीक्षक सुनील पवार, अरुण थोरात, सहायक पोलिस निरीक्षक मारुती कदम, पोलिस उपनिरीक्षक जालिद्रा लांबे, पोलिस कॉन्स्टेबल विजय थोरात, महेश धाडवड, सचिन, मुंबई गुन्हे शाखे 4 चे प्रभारी पोलिस निरीक्षक इंद्रजीत मोरे यांच्या पथकाने उक्त कार्रवाई केली.