क्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
पगडीच्या घरावर कब्जा करणाऱ्या मालकावर एफआयआर दाखल
मुंबई
मुंबईतील कुर्ला परिसरातील पगडीधारकाच्या घरात जबरदस्तीने घुसून कज्बा करणाऱ्या जमीन मालकावर विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कुर्ला येथील एलबीएस रोडवर असलेल्या मुख्तार मंझिलच्या दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 3 मध्ये मोहम्मद चौधरी हे गेल्या अनेक वर्षांपासून पगडीधारक म्हणून राहत होते. त्यांनी काही काळ घर बंद ठेवले होते. याचा फायदा घेत जमीन मालक मुजफ्फर रफिक शेख याने घराचे कुलूप तोडून लंपास केले. याप्रकरणी चौधरी यांनी विनोबा भावे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख हा या इमारतीच्या गच्चीवर बेकायदेशीरपणे फ्लॅटही बांधत आहे. या बेकायदा बांधकामामुळे या जीर्ण इमारतीच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.