क्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

दुधवाला बिल्डरवर पोलिसांची मेहरबानी का ?

श्रीश उपाध्याय

मुंबई

मुंबईचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक
निसार दुधवाला आणि त्यांचा मुलगा नकीब निसार पटेल यांच्यावर एफआयआर नोंदवून तीन आठवडे उलटूनही मुंबई पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत.

याची जाणीव ठेवा कि एफआयआर क्रमांक ०२९२ अन्वये नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये २८ मार्च २०२३ रोजी निसार पटेल यांच्याविरुद्ध बनावट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद आरिफ इब्राहिम अब्दुल यांनी केलेल्या तक्रारीनुसार, 2020 मध्ये झीशान सुलेमानने भिवंडीतील एक जमीन आरिफशी विकत घेण्याचे बोलले. आरीफला जमीन एन डी डब्ल्यू अंजूर रियालिटिचे असल्याचे सांगण्यात आले. कागदपत्रांवर त्याच कंपनीचे नाव असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जीशानने आरिफची त्या कंपनीचे मालक इसाक वलिभाई पटेल, निसार पटेल आणि नकीब निसार पटेल यांच्याशी ओळख करून दिली. भिवंडीच्या जमिनीचा सौदा 1,38,20,100 रुपयांना ठरला होता. आरिफने आयटीईएसद्वारे संपूर्ण पैसे भरले आणि जमीन आपल्या नावावर करून देण्याचे बोलले असता तिघांनी टाळाटाळ सुरू केली. काही महिन्यांनी ती जमीन दुसऱ्याला विकल्याचे आरिफला समजले.


फसवणूक झाल्यामुळे आरिफने नागपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध बनावट कागदपत्रे व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या एफआयआरची नोंद होऊन जवळपास तीन आठवडे उलटले असले तरी अद्याप चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

याप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश ठाकूर आणि झोन 3 चे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button