व्हायरल’ बॅनरचा बावनकुळेंशी संबंध नाही
बॅनरबाज्यांनी मागतली जाहीर माफी
सोशल मीडियावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो असलेले एक बॅनर व्हायरल होत असून ते बॅनर लावणाऱ्यांनी माफीनामा जाहीर केला आहे. हा माफीनाफा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखविल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. व्हायरल होत असलेल्या बॅनरचा दुरान्वयेही संबंध भाजपा व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी नाही हे यामुळे जनतेसमोर आले आहे, हे येथे उल्लेखनीय.
नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे काही उत्साही कार्यकर्त्यांनी श्री हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तेथील रहिवासी मेघराज बेलेकर यांच्या घरावर फ्लेक्स बॅनर लावले होते. हे बॅनर समाजमाध्यमावर व्हायरल झाले. हा प्रकार लक्षात येताच बॅनर काढण्यात आले. सोबतच बॅनरवर नावे लिहून प्रसिद्धीचा प्रयत्न करणाऱ्या पाच व्यक्तिंनी जाहीर माफीनामा लिहून देत ही चूक आमच्याकडून झालेली आहे याकरीता सर्व सदस्यांसह माफी मागतो असा माफीनामा जाहीर केला आहे. या प्रकरणाशी भाजपा व भाजपा प्रदेशाध्यक्षांचा कोणताही संबंध नाही हे घटनाक्रमावरून लक्षात येते.
जशी चूक लक्षात आली तशी त्या कार्यकर्त्यांनी लेखी माफी मागितली व तसे माफीचे बोर्डही लावले. भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहेत. आपण विकासाचे काम करू या असे आवाहन भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यलयाकडून करण्यात आले आहे.