महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांची वसई येथे प्रत्रकार परिषद
मोदी सरकार देशात लोकशाहीची पायमल्ली करीत आहे - नसीम खान
वसई ( प्रतिनिधी)
राहुल गांधी यांची सदस्यता रद्द करण्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आज एकाच दिवशी संपूर्ण देशात संकल्प सत्याग्रह ( DEMOCRACY DIS’QUALIFIED) कार्यक्रमांतर्गत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री नसीम खान यांनी आज वसई येथे प्रमुख कॉँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेत बोलताना नसीम खान म्हणाले की, राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात कशाप्रकारे महागाई, बेरोजगारी, शेतकरी समस्या आणि भ्रष्टाचार वाढला आहे आणि देशाचे पंतप्रधान मोदी आणि अडाणी समूहाचे गहरे संबंध निर्धास्तपणे संसदेत मांडीत आहे. त्यांच्या या निर्धास्तपणाला मोदी सरकार पूर्णपणे घाबरला असल्यामुळेच गुजरात मध्ये खोट्या ओबीसीच्या आधारावर त्यांचे लोकसभेचे सदस्यसत्व रद्द केले. केंद्रातील बीजेपी सरकारने हुकूमशाही पद्धतीने लोकशाहीची पायमल्ली करीत असून देशभरातील तमाम जनतेत त्यांच्या विरोधात आक्रोश आहे. देशात संविधान व लोकशाही जिवंत आहे की नाही? असे प्रश्न देशातील जनताच आता केंद्रातील मोदी सरकारला विचारत आहे.
मोदी सरकार एवढ्यावर थांबले नाही तर राहुल गांधी यांचे खासदारकीचे पद रद्द झाल्यानंतर त्वरित त्यांचे शासकीय निवासस्थान घाईघाईने खाली करण्याची नोटिससुद्धा या मोदी सरकारने द्वेष भावनेतून काढले आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठीच मोदी सरकारकडुन हुकूमशाही पद्धतीने मुस्कटदाबी चालू आहे. तसेच देशात मोदी सरकारच्या विरोधात आवाज उचलणारे राहुल गांधी याच्यासह सर्व विपक्षीय नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून कारवाई केली जात आहे. आता देशामध्ये लोकशाही नसून हुकूमशाही प्रस्थापित झाल्याचे चिन्ह दिसून येत आहे हे देशाच्या लोकशाही व संविधान विरोधी असून काँग्रेस पक्ष केंद्र सरकारचा या कृतीचा जाहीर निषेध करत आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत ओनिल आल्मेडा, भावना जैन, यशवंत सिंह ठाकूर, प्रफुल पाटील, प्रमोद सावंत, संदीप पांडे, पराग पष्टे, जोजो थॉमस, राजेश घोलप, अविश राऊत, विल्फ्रेड डिसोझा, शहजाद मल्लिक, चंद्रसेन ठाकूर व काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.