पुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

अनिल गलगली यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई तर्फे सन २०२०- २०२१ राज्यस्तरीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार अंतर्गत कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व लेखक अनिल गलगली यांस घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मान चिन्ह आणि रु ५१,००० हजार रुपये असे आहे.

मागील 28 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत अनिल गलगली यांचे मराठी व हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. 20 वर्षापासून ते अग्निशिला हिंदी मासिकाचे अविरत प्रकाशन करत आहे. विविध विषयांवर त्यांचे सामायिक लेख प्रकाशित होत असतात. अनिल गलगली यांना पुरस्कार घोषित होताच समाजातील विविध घटक आणि क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button