कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकचे लेखापरिक्षण करण्यासाठी श्री.डी.टी. छत्रीकर, विभागीय सहनिबंधक यांची नियुक्ती…
चाचणी लेखापरीक्षणाबाबतचे परिशिष्ट
१. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकने खालील साखर कारखाने व कंपनी यांना दिलेली कर्जे
* सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. बेलेवाडी, ता. कागल यांना दिलेली कर्जे :-
सदर साखर कारखान्यास बँकेने वेळोवळी दिलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाची तपासणी, कर्ज देण्याची कारणे, महत्तम कर्जवितरण मर्यादेचे उल्लंघन केले आहे वा कसे ? इत्यादी…
* BRISK ब्रिस्क फॅसिलिटीज (शुगर डिव्हीजन) कंपनी प्रा.लि. यांना दिलेली कर्जे. बँकेने वेळोवळी दिलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाची तपासणी, तारण मालमत्तांचा तपशिल, तारण मालमत्तेचे मुल्यांकन, एन.पी.ए. इत्यादी.
दोन्ही संस्थांच्या कर्जाच्या बाबतीत बँकेंचे अध्यक्ष / संचालक श्री. हसन मुश्रीफ यांचेशी असलेले सहसंबंध,
२. शेतक-यांच्या कर्जमाफीच्या रकमांचा व बँकेचा सहसंबंध ३९०५३ शेतक-यांच्या नावाने प्रत्येकी रु.१०,०००/- मुदतठेव ठेवणेत आले आहे किंवा कसे ? या मुदतठेवीच्या समोर श्री. हसन मुश्रीफ परिवार / ब्रिस्क कंपनीस / सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी कारखान्यास रु.४०.०० कोटी रकमेचे कर्ज देणेत आले आहे किवा कसे ?