बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

महेश पारकर आणि अश्विन मलिक मेश्राम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सांताक्रूझ मध्ये मेगा हेल्थ कार्ड शिबीर संपन्न

मुंबई

भाजपचे मुंबई प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक श्री महेश पारकर आणि अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोळीबार रोड, सांताक्रूझ पूर्व येथे आयुष्यमान हेल्थ कार्डचे मेगा शिबीर आयोजित करण्यात आले होते.

स्थानिक रहिवाश्यांच्या प्रचंड प्रतिसादात हे शिबीर पार पडले. ५५० हुन अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आभा कार्डची विनामूल्य सेवा प्रदान करण्यात आली. केंद्र शासनाच्या आभा कार्ड मध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते व क्युआर कोड स्कॅन केल्याने पुनः प्राप्त करता येते.

फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, “पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेला आभा कार्ड प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे व सर्वानी केंद्र सरकारच्या या आणि अशा अनेक लोकोपयोगी योजनांचा अवश्य लाभ घेतला पाहिजे”.

सदर शिबीर श्री विजय डोइफोडे- जन संपर्क अधिकारी, अश्विन मलिक मेश्राम फौंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरास महेश पारकर यांच्या समवेत श्रीमती राखी पारकर आणि बांद्रा पूर्व व सांताक्रुझ परिसरातील भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button