पुरस्कारात मिळालेली धनराशी अनिल गलगली यांनी दिली सुपूर्द केली देवदेश प्रतिष्ठानला
प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पुरस्कार स्वरूपात मिळालेली आर्थिक धनराशी देवदेश प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी सुपूर्द केली आहे. जेष्ठ पत्रकार अनिल गलगली हे आरटीआय कार्यकर्ते आहेत. सरकारी स्त्रोतांकडून मिळालेली अचूक माहिती आणि प्रमाणित दस्तऐवजांतून अनेकवेळा मीडियाच्या हेडलाइन्स मिळवल्या आहेत. त्यांनी सरकारी अधिकारी आणि राजकारणी यांच्याकडून सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार आणि निधीचा गैरवापर उघडकीस आणला आहे.
नुकतेच देवदेश प्रतिष्ठान आणि माय ग्रीन सोसायटीच्या माध्यमातून मुंबईतील डब्बेवाल्यांसाठी BLS ट्रेनिंग आणि जनजागृती चा कार्यक्रम जेबी नगर चकाला येथील बगडका महाविद्यालय मध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय सद् विचार मंचातर्फे मिळणारी पुरस्कार स्वरूपातील धनराशी अनिल गलगली यांनी देवदेश प्रतिष्ठानच्या पुढील कार्यासाठी जाहीर केली होती. त्याप्रमाणे पुरस्कारात मिळालेली ११ हजार रुपयांची आर्थिक राशि अनिल गलगली यांनी देवदेश प्रतिष्ठानच्या कार्यासाठी संस्थचे अध्यक्ष डॉ वैभव देवगिरकर यांच्या भटवाडी येथील क्लीनिक मध्ये भेट घेऊन ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.
अनिल गलगली यांनी संस्थेला दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल डॉ वैभव देवगिरकर यांनी आभार व्यक्त केले असून देवदेश प्रतिष्ठानला दिलेली देणगी म्हणजे बीएलएस प्रशिक्षण आणि कॅन्सर जनजागृतीसाठी केलेल्या कामासाठी त्यांचा एक प्रकारचा आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली.